Aarti Badade
उन्हाळ्यात घराचे तापमान वाढू लागते. भिंती तापल्यामुळे फॅन किंवा एसी असूनही अंगातून घामाच्या धारा वाहतात. अशा वेळी काही खास झाडे तुम्हाला नैसर्गिक थंडावा देऊ शकतात.
Home cooling plants
Sakal
काही झाडे आहेत जी केवळ ऑक्सिजन देत नाहीत, तर आपल्या आजूबाजूचे वातावरण थंड ठेवण्याचे कामही करतात. ही झाडे घरात लावल्यास वाढत्या तापमानापासून आराम मिळतो.
Home cooling plants
Sakal
मनी प्लांट हे दिसायला सुंदर तर असतेच, पण ते घर थंड ठेवण्यासाठीही अतिशय प्रभावी आहे. हे झाड घरात ताजी हवा खेळती ठेवते आणि प्रदूषण कमी करण्यास मदत करते.
Home cooling plants
Sakal
कोरफडीचे झाड घरातील तापमानाची पातळी कमी करण्यास मदत करते. हे झाड कार्बन डायऑक्साइड शोषून घेते आणि रात्रीऑक्सिजन सोडते, ज्यामुळे घरातील हवा थंड राहते.
Home cooling plants
Sakal
ही झाडे केवळ थंडावा देत नाहीत, तर हवेतील हानिकारक घटक (Toxins) शोषून घेतात. यामुळे घरातील हवा ताजी राहते आणि श्वास घेण्यास त्रास होत नाही.
Home cooling plants
Sakal
मनी प्लांट आणि कोरफड या दोन्ही झाडांना खूप कमी निगा लागते. तुम्ही ती खिडकीत किंवा घराच्या कोपऱ्यात सहज लावू शकता. कमी पाण्यातही ही झाडे चांगली वाढतात.
Home cooling plants
Sakal
उन्हाळ्यात लाईट गेल्यावर घरात थांबणे कठीण होते. ही झाडे तुमच्या खोलीतील तापमान नियंत्रित ठेवतात, ज्यामुळे तुम्हाला घामाचा त्रास कमी होतो आणि नैसर्गिक थंडावा मिळतो.
Home cooling plants
Sakal
Buttermilk avoid drink this mistakes
Sakal