सणासुदीआधी पूजेची तांब्याची भांडी नव्यासारखी चमकवा; वापरा 'या' हटके ८ ट्रिक्स

Anushka Tapshalkar

लिंबाचा रस

लिंबाच्या रसात थोडा खाण्याचा सोडा मिसळून घट्ट पेस्ट तयार करा. भांड्यांना लावून ५ मिनिटांनी धुवा. तांब्याची चमक परत येण्यास मदत होते.

Lemon Juice

|

Sakal

राख

पारंपरिक पद्धतीने लाकडाची बारीक राख वापरून तांब्या-पितळेची भांडी घासली जातात. राखेमुळे तेलकटपणा आणि काही डाग दूर करण्यास मदत होऊ शकते.

Copper Utensils Cleaning Tips

|

sakal

व्हिनेगर + मीठ + पीठ

एक चमचा व्हिनेगर, मीठ आणि गव्हाचे पीठ एकत्र करून पेस्ट बनवा. ही पेस्ट भांड्यावर लावून हलक्या हाताने घासा आणि पाण्याने धुवा.

Copper Utensils Cleaning Tips

|

sakal

चिंच

चिंच पाण्यात भिजवून तिचा गर तयार करा. त्यात थोडे मीठ मिसळून भांड्यांवर घासा. जुनाट काळेपणा आणि डाग कमी होण्यास मदत होईल.

Tamarind

|

Sakal

केचअप

केचअपमधील आम्लीय घटक तांब्या-पितळेवरील ऑक्सिडेशनचा थर सैल करण्यास मदत करू शकतात. भांड्यावर केचअप लावून सुमारे १० मिनिटे ठेवा आणि नंतर स्वच्छ धुवा.

Ketchup

|

Sakal

आंबट ताक किंवा दही

आंबट ताक किंवा दह्यात थोडे मीठ आणि हळद मिसळा. भांडी काही वेळ त्यात बुडवून ठेवा आणि नंतर स्वच्छ धुवा. यामुळे भांड्यांची चमक खुलण्यास मदत होऊ शकते.

Copper Utensils Cleaning Tips

|

sakal

लिंबाची साल

लिंबाचा रस काढल्यानंतर उरलेली साल फेकू नका! तिच्या आतील भागाने भांड्यांवर हलक्या हाताने घासा. त्यानंतर पाण्याने धुऊन कोरड्या कापडाने पुसा.

Lemon peel |

Sakal

पितांबरी पावडर

बाजारात मिळणारी पितांबरी पावडर कोमट पाण्यात मिसळा. स्क्रबरच्या मदतीने भांडी हलक्या हाताने घासा. काळा थर आणि डाग साफ करण्यासाठी हा सोपा पर्याय आहे.

Copper Utensils Cleaning Tips

|

sakal

रोज सकाळी रिकाम्यापोटी कच्चा लसूण खाल्ला तर शरीरात नेमकं काय होतं?

Raw Garlic on Empty Stomach Health Benefits

|

sakal

आणखी वाचा