Shubham Banubakode
तांबे हे शरीरासाठी आवश्यक खनिज आहे. रक्तवाहिन्या, मज्जासंस्था आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी त्याची गरज असते.
copper water benefits
esakal
तांब्याच्या भांड्यात पाणी साठवल्याने पाण्यातील काही हानिकारक जिवाणू निष्क्रिय होऊ शकतात. मात्र, यामुळे पाणी पूर्णपणे शुद्ध होतंच असं नाही.
copper water benefits
esakal
तांब्याचं पाणी प्यायल्याने पचनाच्या सर्व समस्या दूर होतात, याचा ठोस पुरावा नाही. पचनासाठी संतुलित आहार आणि पुरेसं पाणी महत्त्वाचं आहे.
copper water benefits
esakal
तांबे शरीरातील कोलेजनच्या निर्मितीत मदत करतं. मात्र, तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने त्वचा चमकदार होते, हे सिद्ध झालेलं नाही.
copper water benefits
esakal
तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवण्याची पारंपरिक पद्धत प्रचलित आहे. मात्र, आठ तास ठेवल्याने आरोग्याला अधिक फायदा होतो, याचा ठोस वैज्ञानिक पुरावा नाही.
copper water benefits
esakal
दिवसभर फक्त तांब्याच्या बाटलीतील पाणी पिण्याची गरज नाही. जास्त तांबे शरीरात गेल्यास मळमळ, पोटदुखी आणि उलट्या होऊ शकतात.
copper water benefits
esakal
लिंबू, व्हिनेगर यांसारखे आम्लयुक्त पदार्थाची तांब्याशी रिअॅक्शन होऊ शकते. त्यामुळे अशा पदार्थांसाठी तांब्याची भांडी वापरणं टाळावं.
copper water benefits
esakal
तांब्याची बाटली नियमित स्वच्छ ठेवा आणि स्वच्छ पाणी वापरा. यकृताचा आजार किंवा विल्सन डिसीज असल्यास तांब्याच्या अतिरिक्त सेवनाबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्या.
copper water benefits
esakal
Alcohol Facts
esakal