व्हिस्की-वोडकाही फिका! या दारूमध्ये असतं तब्बल ९६ टक्के अल्कोहोल

Shubham Banubakode

सर्वाधिक अल्कोहोल

दारू म्हटलं की अनेकांना व्हिस्की, रम किंवा वोडका आठवते. पण जगात असेही काही मद्यप्रकार आहेत, ज्यांच्यात तब्बल ९५ ते ९६ टक्के अल्कोहोल असतं.

Alcohol Facts

|

esakal

Spirytus Rektyfikowany

पोलंडमध्ये तयार होणाऱ्या Spirytus Rektyfikowany या मद्यप्रकारात तब्बल ९६ टक्के अल्कोहोल असतं. त्यामुळे सर्वाधिक अल्कोहोल असलेल्या स्पिरिट्समध्ये त्याचं नाव घेतलं जातं.

Alcohol Facts

|

esakal

किती अल्कोहोल?

या मद्याच्या १०० मिलिलिटरमध्ये जवळपास ९६ मिलिलिटर एथेनॉल असतं. याउलट, नेहमीच्या व्हिस्की आणि वोडकामध्ये साधारण ४० टक्के अल्कोहोल असतं.

Alcohol Facts

|

esakal

Everclear 190

अमेरिकेत मिळणाऱ्या Everclear 190 या स्पिरिटमध्ये ९५ टक्के अल्कोहोल असतं. Golden Grain 190 या प्रकारातही जवळपास तेवढंच प्रमाण असतं.

Alcohol Facts

|

esakal

दारूचा वापर कशासाठी?

Spirytus Rektyfikowany चा वापर प्रामुख्याने लिकर, फळांपासून तयार होणारी मद्यं आणि वेगवेगळी मिश्रणं बनवण्यासाठी केला जातो. मात्र, हे मद्य थेट पिण्यासाठी योग्य नाही.

Alcohol Facts

|

esakal

अल्कोहोल तयार कसं होतं?

मद्यनिर्मितीमध्ये अल्कोहोल आणि पाणी वेगळं करण्यासाठी डिस्टिलेशन प्रक्रिया वापरली जाते. या प्रक्रियेमुळे मद्यातील अल्कोहोलचं प्रमाण वाढवता येतं. पण त्यालाही काही मर्यादा असतात.

Alcohol Facts

|

esakal

१०० टक्के का नसतं?

इथेनॉल आणि पाण्याचं मिश्रण साध्या डिस्टिलेशन प्रक्रियेतून वेगळं करताना साधारण ९६ टक्क्यांपुढे शुद्धता वाढवणं कठीण होतं. त्यामुळे अनेक स्पिरिट्समध्ये अल्कोहोलचं प्रमाण ९५ ते ९६ टक्क्यांच्या आसपास असतं.

Alcohol Fact

|

 esakal

दारू पिणं धोकादायक?

एवढं जास्त अल्कोहोल असलेलं मद्य थेट प्यायल्यास विषबाधा होऊ शकते. त्यामुळे आरोग्याला मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

Alcohol Fact

|

esakal

विदर्भातील खजिन्याची विहीर, छत्रपती शिवरायांशी आहे थेट संबंध

Alcohol Fact

|

esakal

हेही वाचा -