कोथिंबिरीचे पाणी केसांना लावल्याने केस लांब होतात का?

सकाळ डिजिटल टीम

कोथिंबीर आता हेअर केअरमध्ये

अन्नाची चव वाढवणारी कोथिंबीर आता केसांच्या काळजीसाठी आणि हेअर केअर रूटीनमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरली जात आहे.

Coriander Water for Hair Growth

|

sakal 

केस गळतीवर उपाय

मेथी, कांदा आणि तांदळाच्या पाण्यानंतर आता कोथिंबिरीचे पाणी आणि रस केस गळती रोखण्यासाठी सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे.

Coriander Water for Hair Growth

|

sakal 

स्काल्पचे पोषण

कोथिंबिरीमध्ये असलेली पोषक तत्वे डोक्याच्या त्वचेला (स्काल्प) योग्य पोषण देतात, ज्यामुळे केसांची मुळे मजबूत होण्यास मदत होते.

Coriander Water for Hair Growth

|

sakal 

कोथिंबिरीचे पाणी तयार करण्याची पद्धत

हा घरगुती उपाय करण्यासाठी एक मूठभर कोथिंबीर स्वच्छ धुवून २ कप पाण्यात चांगली उकळून घ्यावी.

Coriander Water for Hair Growth

|

sakal 

असा करा वापर

उकळलेले पाणी थंड झाल्यानंतर ते गाळून घ्यावे आणि डोक्याच्या त्वचेवर व्यवस्थित लावून काही मिनिटांनी केस साध्या पाण्याने धुवावेत.

Coriander Water for Hair Growth

|

sakal 

अँटीऑक्सिडंट्स

कोथिंबिरीतील अँटीऑक्सिडंट्स केसांच्या मुळांना बळकट करतात आणि फ्रि रॅडिकल्समुळे केसांचे होणारे नुकसान रोखण्यास मदत करतात.

Coriander Water for Hair Growth

|

sakal 

हेअर टॉनिक

केसांच्या आरोग्यासाठी आणि स्काल्प डिटॉक्स करण्यासाठी कोथिंबिरीचे पाणी हा एक अत्यंत सुरक्षित आणि नैसर्गिक पर्याय मानला जातो.

Coriander Water for Hair Growth

|

sakal 

अनुभव

कोथिंबीर पाण्याच्या नियमित वापराने केसांची गुणवत्ता आणि वाढ सुधारण्यास मदत होते असा अनेक युजर्सचा दावा आहे.

Coriander Water for Hair Growth

|

sakal 

तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

एक्सपर्ट्सच्या मते हा उपाय स्काल्पच्या आरोग्यासाठी उत्तम आहे, पण तीव्र केस गळतीमागे इतरही अनेक शारीरिक कारणे असू शकतात.

Coriander Water for Hair Growth

|

sakal 

डॉक्टरांचा सल्ला

केस गळतीचे कारण आनुवंशिकता किंवा हार्मोन्सचे असंतुलन असल्यास या घरगुती उपायांसोबतच डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत गरजेचे आहे.

Coriander Water for Hair Growth

|

sakal 

Health Benefits of Watermelon Seeds

|

sakal 

आणखी वाचा