Shubham Banubakode
मॉरिशस हे हिंदी महासागरातील एक बेट असून ते आफ्रिकेच्या आग्नेय किनाऱ्याजवळ आणि मादागास्करच्या पूर्वेस आहे.
मॉरिशस हा देश नैसर्गिक सौंदर्याने नटलेला आहे.
भारतातून दरवर्षी हजारो पर्यटक मॉरिशसला भेट देतात.
पण भारतातून मॉरिशसला जाण्याचा खर्च किती येतो? तुम्हाला महिती का?
जर तुम्ही दिल्लीहून मॉरिशसला जात असाल तर दोन्ही बाजूंच्या विमान प्रवासाचा खर्च ४२ हजार रुपये येतो.
मॉरिशसला जाण्यासाठी भारतीयांना व्हिसा आवश्यक नाही.
मॉरिशसला तुम्ही ९० दिवसांसाठी व्हिसाशिवाय प्रवास करू शकता.
जर तुम्ही मुंबईहून मॉरिशसला जात असाल तर दोन्ही बाजूंच्या विमान प्रवासाची तिकीट ३५,००० रुपये आहे.
मॉरिशसमध्ये हॉटेलचे भाडे जवळपास १४०० रुपयांपासून सुरू होते.
मॉरिशसमध्ये जेवणदेखील फार स्वस्त आहे. तिथे तुम्ही ५०० रुपयात एका वेळेचं जेवण करू शकता.
मॉरिशसमध्ये फिरण्यासाठी विविध पर्यटनस्थळे आहेत. याशिवाय अनेक अॅक्टीव्हीटी तुम्ही करू शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागतील.
मे ते ऑक्टोबर दरम्यानचा काळ हा मॉरिशस भेटीसाठी सर्वोत्तम मानला जातो.