इतिहासातील सर्वात महागडा खजिना! ‘या’ सिंहासनाची किंमत ताजमहलपेक्षा जास्त

Aarti Badade

ऐतिहासिक सौंदर्याचा कळस

मुघल साम्राज्याची शान वाढवण्यासाठी शाहजहाने बनवलेले 'मयूर सिंहासन' हे जगातील आजवरचे सर्वात भव्य आणि महागडे सिंहासन मानले जाते.

Mayur Singhasan cost history

|

Sakal

'तख़्त-ए-ताउस' म्हणजे काय?

मुघल संपत्तीचे दर्शन घडवण्यासाठी हे सिंहासन तयार केले होते. त्यावर दोन सुंदर मोर कोरलेले असल्यामुळे याला 'मयूर सिंहासन' किंवा फारसी भाषेत 'तख़्त-ए-ताउस' म्हटले जायचे.

Mayur Singhasan cost history

|

Sakal

7 वर्षांची अपार मेहनत

उस्ताद साद-उल-गिलानी यांच्या नेतृत्वाखाली शेकडो निष्णात कारागिरांनी तब्बल ७ वर्षे रात्रंदिवस मेहनत घेऊन १६३५ मध्ये हे अद्वितीय सिंहासन पूर्ण केले.

Mayur Singhasan cost history

|

Sakal

अनमोल रत्नांची जडणघडण

हे सिंहासन केवळ सोन्याचे नव्हते, तर त्यावर हिरे, पाचू, माणिक आणि जगातील सर्वात प्रसिद्ध 'कोहिनूर' हिरा जडलेला होता.

Mayur Singhasan cost history

|

Sakal

१६३५ मधील त्याची किंमत

ज्या काळात ताजमहल बनवण्यासाठी ३.२ कोटी रुपये खर्च झाले होते, त्याच काळात या सिंहासनाची निर्मिती किंमत १०.७० कोटी रुपये इतकी अवाढव्य होती.

Mayur Singhasan cost history

|

Sakal

आजची किंमत किती असेल?

इतिहासकारांच्या मते, जर हे सिंहासन आजही शाबूत असते, तर त्याची किंमत १.३५ लाख कोटी रुपयांपेक्षाही जास्त असती. हे जगातील कोणत्याही ऐतिहासिक वास्तूच्या किमतीपेक्षा जास्त आहे.

Mayur Singhasan cost history

|

Sakal

अद्भूत आणि देखणी रचना

सिंहासनाच्या खांबांवर मोत्यांच्या माळा आणि मध्यभागी रत्नांनी सजवलेला 'कल्पवृक्ष' होता. छताच्या आतल्या बाजूलाही मौल्यवान हिऱ्यांची नक्षी कोरलेली होती.

Mayur Singhasan cost history

|

Sakal

नादिरशाहची लूट आणि रहस्य

१७३९ मध्ये नादिरशाहने हे सिंहासन लुटून इराणला नेले. त्याच्या मृत्यूनंतर हे सिंहासन गायब झाले; असे मानले जाते की ते तोडून त्यातील रत्ने वेगवेगळी विकली गेली.

Mayur Singhasan cost history

|

sakal

कुतुबमिनारपेक्षाही उंच! जाणून घ्या 'या' अजिंक्य किल्ल्याचा इतिहास!

Mehrangarh Fort history

|

Sakal

येथे क्लिक करा