संतोष कानडे
जगामध्ये असेकाही तटस्थ आणि कणखर देश आहेत, ज्यांच्यावर युद्धाचा परिणाम होत नाही. त्यामुळे पर्यटनासाठी हे देश सुरक्षित मानले जातात.
न्यूझिलंड हा देश जगातील सर्वात शांत देशांपैकी एक आहे. युद्ध किंवा राजकीय तणावापासून दूर असल्यामुळे पर्यटनासाठी सुरक्षित मानला जातो.
जपानमध्ये गुन्हेगारी अत्यंत कमी आहे आणि आपत्कालीन व्यवस्थाही मजबूत आहे. टोकियो, क्योटो आणि ओसाका ही शहरे पर्यटकांसाठी लोकप्रिय आहेत.
उत्तर अमेरिकेतील कॅनडा हा देश सुरक्षितता, स्थिर अर्थव्यवस्था आणि मजबूत कायदा व्यवस्था यामुळे पर्यटकांसाठी सुरक्षित आहे.
आइसलँड हा जगातील सर्वात सुरक्षित देशांपैकी एक मानला जातो. या देशात गुन्हेगारी अत्यंत कमी असून सरकार स्थिर आहे.
युरोपमधील शांत आणि सुरक्षित देशांमध्ये पोर्तुगालचा समावेश होतो. लिस्बन, पोर्तो आणि अल्गार्वे समुद्रकिनारे हे पर्यटनासाठी लोकप्रिय आहेत.
सिंगापूर हा आशियातील सर्वात सुरक्षित देशांपैकी एक. कठोर कायदे आणि उत्कृष्ट पायाभूत सुविधा यामुळे पर्यटकांना सुरक्षित वातावरण मिळते.
या देशांमध्ये फिरायला जाणं म्हणजे पर्यटनाचा आनंद तर आहेच पण सुरक्षिततेला दिलेलं प्राधान्यदेखील आहे.