नो टेन्शन! गॅसचं संकट रोखण्यासाठी मोदींचा 'प्लॅन-बी' रेडी

संतोष कानडे

इराण

इराण-इस्रायल युद्धामुळे सध्या गॅस टंचाईचा सामना व्यावासायिकांना करावा लागतोय. तर घरगुती सिलिंडरसाठी पॅनिक बुकिंग सुरु आहे.

आखाती देश

मात्र भारत आता केवळ आखाती देशांवर अवलंबून नाही. रशिया आणि अमेरिकेकडून गॅस आयात वाढवण्यासाठी नवे करार करण्यात आलेले आहेत.

विशाखापट्टणम

शिवाय भारताने विशाखापट्टणम आणि मंगळुरू सारख्या ठिकाणी गॅस आणि तेलाचा मोठा आपत्कालीन साठा करून ठेवलाय.

हरदीप सिंह पुरी

मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी स्पष्ट केले आहे की, भारत कोणत्याही परिस्थितीत ऊर्जा पुरवठा खंडित होऊ देणार नाही.

रिलायन्स

रिलायन्स (KG-D6) आणि ONGC सारख्या कंपन्यांना देशांतर्गत गॅस उत्पादन वाढवण्याचे तातडीचे निर्देश देण्यात आले आहेत.

गॅस

गॅसवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सरकार सोलर आणि बायो-गॅस (CBG) प्रकल्पांना गती देत आहे.

निर्बंध

साठेबाजी रोखण्यासाठी गॅस वितरणावर तात्पुरते निर्बंध लादले आहेत, जेणेकरून सर्वांना समान पुरवठा मिळेल.

ओमान

कतार आणि ओमानसारख्या देशांशी २० वर्षांचे दीर्घकालीन करार केल्यामुळे भारताला सवलतीच्या दरात गॅस मिळत राहील.

पॅनिक बुकिंग

सरकारची रणनीती भक्कम आहे, त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवता पॅनिक बुकिंग करु नये, असं सांगण्यात येतंय.

इराणध्ये हिंदूंची अवस्था कशीय?

<strong>येथे क्लिक करा</strong>