एका रुपयाचं मूल्य ३०० रुपये; 'या' देशात नक्की फिरायला जा

सकाळ डिजिटल टीम

परदेश

तुम्हाला परदेशात फिरायला जायचंय आणि तेही अगदी स्वस्तात तर हे पर्याय निवडू शकता.

व्हिएतनाम

व्हिएतनाम हे बजेट डेस्टिनेशन आहे. भारतीयांनाही हे ठिकाण जाम आवडतं.

स्ट्रीट फूड

निसर्गसौंदर्य आणि स्वस्त स्ट्रीट फूडसाठी हा देश प्रसिद्ध आहे. येथे एका रुपयाचं मूल्य अंदाजे ३०० व्हिएतनामी डाँग इतकं आहे.

इंडोनेशिया बाली

इंडोनेशिया बाली येथे तुम्ही अत्यंत स्वस्त अलिशान व्हिला अनुभवू शकता. शिवाय विस्तीर्ण समुद्रकिनारे.

रुपयाचं मूल्य

येथे एका रुपयाचं मूल्य १९० इंडोनेशियन रुपिया आहे. उबुद, तनाह लोट मंदिर ही ठिकाणं बघता येतील.

मूल्य

लाओस देशाबद्दल तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. येथे एका रुपयाचं मूल्य तब्बल २५० लाओशियन किप इतकं आहे.

धबधबा

येथे कुआंग सी धबधबा, लुअंग प्रबांग बघता येईल. शिवाय बौद्ध संस्कृती अनुभवण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.

उझबेकिस्तान

उझबेकिस्तान देशामध्ये १ रुपयाचं मूल्य अंदाजे १५० उझबेकिस्तानी सोम इतकं आहे. येथे सिल्क रोड आणि ऐतिहासिक वास्तूकला अनुभवता येतील.

ताश्कंद

समरकंद, बुखारा, ताश्कंद हे खास आकर्षण आहेत. या देशात अनेक भारतीय पर्यटनासाठी जातात.

धोक्याची सूचना कुत्र्यांना आधीच कशी मिळते?

<strong>येथे क्लिक करा</strong>