स्फोट किंवा अपघाताबद्दल कुत्र्यांना आधीच कसं कळतं?

संतोष कानडे

रील्स

आपण अनेकदा रील्समध्ये बघतो की, अपघात किंवा स्फोट होण्यापूर्वीच कुत्रे सतर्क होतात आणि मालकाचा जीव वाचवतात.

तथ्य

याच खरंच तथ्य आहे का? मुळात यामागे कुठलीही दैवी शक्ती मुळच नसून विज्ञान आहे.

इंद्रिये

काही प्राण्यांकडे असलेल्या अतिसंवेदनशील इंद्रियांमुळे हे शक्य होतं. निसर्गातील सुक्ष्म बदल हे प्राणी टिपतात.

ज्वालामुखी

चक्रीवादळ, त्सुनामी, ज्वालामुखी उद्रेक होण्यापूर्वी इन्फ्रासाऊंड म्हणजे कमी वारंवारतेचे आवाज निर्माण होतात, हे श्वानांना कळतं.

सुक्ष्म रसायन

स्फोटकांमधील सुक्ष्म रसायनांचा वास कुत्र्यांना लांबूनच येतो. शिवाय फिट येणे, हार्ट अटॅक येणे हे रासायनिक बदल ते वासांवरुन ओखळू शकतात.

अपघात

वाहनांचा अपघातही कुत्र्यांना कळतो. कारण मर्यादेबाहेरचा वेग, इंजिनमधील बिघाड किंवा टायरमधील कमी झालेली हवा, हे बदल ते आवाजावरुन ओळखतात.

ब्रेकचा वास

अपघातापूर्वी अनेकदा ब्रेकचा वास येतो, वायर जळणे किंवा इंधन गळती, हे बदल कुत्रे वासावरुन ओळखतात.

वाहन चालक

एवढंच नाही तर वाहन चालक जर तणावात असेल, घाबरलेला असेल किंवा त्याला झोप येत असेल तर शरीरातून बाहेर पडलेल्या संप्रेरकांवरुन कुत्रे सावध होतात.

भूकंप

भूकंप, विजा कडाडणे, हेदेखील श्वानांना आधीच कळतं. त्यामुळे कुत्रे स्वतः सोबत मालकालाही वाचवण्याचा प्रयत्न करीत असतात.

संजय राऊतांनी उल्लेख केलेला राजा जयचंद कोण होता?

<strong>येथे क्लिक करा</strong>