हाडं बळकट होण्यासाठी गायीचं की म्हशीचं दूध कोणतं आहे जास्त उपयुक्त?

Monika Shinde

हाडं मजबूत

हाडं मजबूत ठेवण्यासाठी दूध खूप फायदेशीर असतं. पण गायीचं की म्हशीचं दूध बळकट हाडांसाठी अधिक उपयुक्त आहे, हे जाणून घेऊया.

म्हशीचं दूध

म्हशीच्या दूधात कॅल्शियम आणि फॉस्फरस जास्त प्रमाणात असतो. हे घटक हाडांच्या मजबुतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.

कॅल्शियम हाडं

कॅल्शियम हाडं तयार करण्यास आणि त्यांचा आरोग्य टिकवण्यास मदत करतो. म्हशीच्या दूधात हा घटक तुलनेने अधिक प्रमाणात असतो.

फॉस्फरस

फॉस्फरस देखील हाडांच्या बांधणी आणि मजबुतीसाठी आवश्यक आहे. म्हशीच्या दूधात फॉस्फरसचे प्रमाण गायीच्या दूधाच्या तुलनेत जास्त असते.

गायीच्या दूधात फॅट कमी

गायीच्या दूधात फॅट कमी असतो, त्यामुळे ते पचवायला सोपे आणि हलकं असतं. त्यामुळे काही लोकांना गायीचं दूध अधिक चांगलं वाटतं.

अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन्स

गायीच्या दूधात अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन्स जास्त असल्याने ते शरीरासाठी फायदेशीर ठरते आणि पचन सुधारते.

व्हिटॅमिन D आणि प्रथिने

दोन्ही दूधांमध्ये व्हिटॅमिन D आणि प्रथिने असतात, जे हाडांसाठी उपयुक्त आहेत. तुमच्या आरोग्याच्या गरजेनुसार दूध निवडा.

म्हशीचं दूध हाडांसाठी उत्तम

म्हशीचं दूध हाडांसाठी अधिक फायदेशीर असलं तरी, पचनासाठी गायीचं दूध चांगलं. तुमच्या शरीरानुसार दूध निवडून बळकट रहा

दररोज स्क्वाट्स का करावे? जाणून घ्या आरोग्यदायक फायदे!

येथे क्लिक करा