Monika Shinde
स्क्वाट्स हा एक सोपा, पण संपूर्ण शरीरासाठी परिणामकारक व्यायाम आहे. पाय, पोट, कंबर आणि स्नायू मजबूत करण्यासाठी दररोज केल्यास फिटनेस कायम राहतो.
दररोज स्क्वाट्स केल्याने मांडी, पोट आणि पाठीचे स्नायू बळकट होतात. त्यामुळे रोजच्या हालचाली अधिक सहज आणि प्रभावी होतात.
पाठीचा खालचा भाग मजबूत ठेवण्यासाठी स्क्वाट्स उत्तम. नियमित केल्यास पाठदुखी कमी होते आणि पोस्चर सुधारतो.
स्क्वाट्समुळे शरीरातील चरबी कमी होते आणि मेटॅबॉलिझम वाढतो. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी हा व्यायाम अत्यंत उपयुक्त आहे.
योग्य पद्धतीने स्क्वाट्स केल्यास गुडघे, कंबर आणि कूल्ह्यांचे सांधे मजबूत होतात. त्यामुळे सांधेदुखी कमी होण्यास मदत होते.
पुरुषांमध्ये स्क्वाट्स केल्याने टेस्टोस्टेरोन आणि वाढीचे संप्रेरक नैसर्गिकरित्या वाढतात, जे स्नायू वाढीसाठी महत्त्वाचे आहेत.
स्क्वाट्ससाठी कोणत्याही उपकरणांची गरज नाही. घरच्या घरी सहज करता येतो आणि दिवसातील १० मिनिटे देऊनही तंदुरुस्ती मिळवता येते.