Aarti Badade
गाय आणि म्हैस या दोन्हींच्या दुधाचे फायदे वेगवेगळे आहेत. पण पचन आणि मूत्रपिंडासाठी कोणते दूध योग्य आहे, हा प्रश्न अनेकांना पडतो.
गायीच्या दुधात चरबी आणि प्रथिने कमी असतात, त्यामुळे ते हलके आणि पचनासाठी सोपे मानले जाते.
गॅस, आम्लपित्त किंवा अपचनाची समस्या असणाऱ्यांसाठी गायीचे दूध फायदेशीर ठरते.
व्हिटॅमिन ए आणि कॅल्शियमने समृद्ध असल्यामुळे ते डोळ्यांसाठी आणि हाडांसाठी उपयुक्त असते.
म्हशीच्या दुधात प्रथिने आणि चरबी जास्त असतात, त्यामुळे ते घट्ट, क्रिमी आणि उर्जा वाढवणारे असते.
जास्त मेहनत करणारे, व्यायाम करणारे किंवा जिमला जाणारे लोक म्हशीचे दूध प्राधान्याने घेतात.
तज्ज्ञांच्या मते, गायीचे दूध हलके असल्यामुळे मूत्रपिंडांवर ताण पडत नाही, तर म्हशीच्या दुधातील जास्त प्रथिने मूत्रपिंडावर भार टाकू शकतात.
जर हलके आणि पचायला सोपे दूध हवे असेल तर गायीचे दूध घ्या, आणि जर शक्ती व ऊर्जा वाढवायची असेल तर म्हशीचे दूध योग्य ठरते.