Aarti Badade
जर तुमचे पोट नियमितपणे साफ होत नसेल, तर बद्धकोष्ठता, मूळव्याध, फिशर आणि आतड्यांसंबंधी समस्या उद्भवू शकतात.
सर्वात सामान्य परिणाम म्हणजे बद्धकोष्ठता. यामध्ये शौचास साफ न होणे, जोर लावावा लागणे आणि कठीण शौच यांचा समावेश होतो. (बीबीसीनुसार)
बद्धकोष्ठतेमुळे गुदशयाच्या भागातील रक्तवाहिन्या सुजतात आणि मूळव्याध होतो. तसेच, गुदशयाच्या त्वचेला भेगा पडून फिशर होऊ शकतो, ज्यामुळे शौचास वेदना आणि रक्त येते.
पोट साफ न झाल्यास आतड्यांमध्ये सूज, संसर्ग किंवा इतर गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.
पोट व्यवस्थित साफ न झाल्यामुळे गॅस, पोट फुगणे आणि अपचनाचा त्रास होऊ शकतो.
बद्धकोष्ठतेमुळे ऍसिडिटी आणि छातीत जळजळ होण्याची शक्यता वाढते.
पोट साफ न झाल्यास शरीरात विषारी पदार्थ जमा होऊ शकतात, ज्यामुळे थकवा आणि अशक्तपणा जाणवतो.
काही अभ्यासांनुसार, दीर्घकाळच्या बद्धकोष्ठतेमुळे हृदयविकारांचा आणि आतड्यांच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो.
भरपूर पाणी प्या,फायबरयुक्त आहार घ्या,नियमित व्यायाम करा.,शौचास जाण्याची इच्छा दाबून ठेवू नका,गंभीर असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.