फाटलेल्या टाचांची समस्या दूर करण्यासाठी जाणून घ्या सोपे उपाय!

Aarti Badade

टाचांना पडल्या आहेत भेगा?

कोरडी त्वचा, हवामानातील बदल किंवा सतत अनवाणी चालण्यामुळे टाचांना भेगा पडू शकतात, पण काही सोप्या उपायांनी त्यांची काळजी घेता येते.

cracked heels

|

Sakal

ग्लिसरीन आणि गुलाबजल

दोन चमचे ग्लिसरीन आणि एक चमचा गुलाबजल मिसळून रात्री स्वच्छ टाचांवर लावा आणि त्यावर सुती मोजे घाला.

cracked heels

|

Sakal

तांदळाचे पीठ आणि खोबरेल तेल

तांदळाचे पीठ, काही थेंब ॲपल सायडर व्हिनेगर आणि खोबरेल तेल एकत्र करून पेस्ट तयार करा आणि कोमट पाण्यात पाय भिजवल्यानंतर टाचांवर लावा.

cracked heels

|

Sakal

व्हॅसलीन आणि खोबरेल तेल

व्हॅसलीन आणि खोबरेल तेल एकत्र करून रात्री टाचांना लावल्यास त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत होऊ शकते.

cracked heels

|

Sakal

मोहरीचे तेल आणि मेणाचा लेप

मोहरीचे तेल आणि वितळवलेले मेण थंड झाल्यानंतर टाचांवर पातळ थराने लावून त्यावर सुती मोजे घालता येतात.

cracked heels

|

Sakal

टाचांची नियमित काळजी घ्या

पाय स्वच्छ आणि कोरडे ठेवणे, नियमित मॉइश्चरायझर वापरणे आणि टाचांवर जास्त घर्षण होणार नाही याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

cracked heels

|

Sakal

डॉक्टरांचा सल्ला घ्या

रक्तस्राव, सूज, पू, तीव्र वेदना किंवा भेगा वारंवार पडत असल्यास घरगुती उपायांवर अवलंबून न राहता त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या.

पोटाच्या गॅसचा हार्ट अटॅकशी काय संबंध? जाणून घ्या

gas and heart attack

|

Sakal

येथे क्लिक करा