Aarti Badade
श्रावणाआधीचा गटारी रविवार खास बनवा झणझणीत मटण चॉप्स फ्राय रेसिपीने. भाकरी किंवा वड्यांसोबत अप्रतिम लागणारा मटण पदार्थ!
मटण चॉप्स, आलं-लसूण पेस्ट, मीठ, हळद, लाल तिखट, तेल, गरम मसाला, मटण मसाला, कांदा-खोबऱ्याचे वाटण, काळा मसाला.
मटण स्वच्छ धुवा, कुकरमध्ये तेल, मसाले, आलं-लसूण पेस्ट आणि हळद टाकून परतून मटण व पाणी घालून शिजवून घ्या.
कढईत तेलात बारीक लसूण आणि कांदा परतवा. त्यात तिखट, हळद, गरम मसाला, काळा मसाला व मटण मसाला घाला.
मसाल्यात कांदा-खोबऱ्याचं वाटण टाका, थोडं पाणी घालून नीट शिजवा. तेल सुटेपर्यंत परतवा.
शिजलेलं मटण तयार मसाल्यात टाका, आवश्यकतेनुसार पाणी घालून छान फ्राय करा. झणझणीत चव येईपर्यंत शिजवा.
हे चॉप्स गरम गरम भाकरी, तांदळाचे वडे किंवा भात यासोबत सर्व्ह करा.
गटारीच्या दिवशी बाहेर जाऊ नका, घरीच बनवा खास मटण चॉप्स फ्राय आणि करा नॉनव्हेज पार्टी धमाल!