Aarti Badade
उन्हाळा सुरू होताच शरीराला आतून थंड ठेवण्यासाठी आपण अनेक पेये पितो, पण 'कोकोनट लस्सी'ची चव आणि थंडावा काही वेगळाच आहे.
Coconut Lassi Recipe
Sakal
नेहमीची दही लस्सी तर तुम्ही प्यायली असेलच, पण नारळाच्या दूधापासून बनलेली ही लस्सी चवीला मलईदार आणि आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
Coconut Lassi Recipe
Sakal
नारळाचे तुकडे आणि दही यांचे मिश्रण या पेयाला एक नैसर्गिक गोडवा आणि ताजेपणा देते, ज्यामुळे तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटते.
Coconut Lassi Recipe
Sakal
३०० ग्रॅम दही, १ कप दूध, १/३ कप ताजे नारळ, २ चमचे फ्रेश क्रीम, साखर, काळी मिरी पावडर, चिमूटभर मीठ आणि बर्फाचे तुकडे.
Coconut Lassi Recipe
Sakal
लस्सीची चव वाढवण्यासाठी त्यात अर्धा चमचा बुकनु पावडर आणि किसलेले ओले खोबरे वापरा, ज्यामुळे लस्सीला हॉटेलसारखी चव येईल.
Coconut Lassi Recipe
Sakal
एका मिक्सरच्या भांड्यात दही, दूध, साखर, फ्रेश क्रीम आणि ताजे नारळाचे तुकडे एकत्र करून घ्या.
Coconut Lassi Recipe
Sakal
त्यात चिमूटभर काळी मिरी पावडर, बुकनु पावडर आणि चवीनुसार थोडे मीठ घालून सर्व घटक एक मिनिट चांगले फिरवून घ्या.
Coconut Lassi Recipe
Sakal
तयार लस्सी एका छान ग्लासमध्ये किंवा नारळाच्या शहाळ्यात काढून घ्या. वरून थोडे चिरलेले खोबरे आणि बर्फाचे तुकडे टाका.
Coconut Lassi Recipe
Sakal
झटपट तयार होणारी ही कोकोनट लस्सी पाहुण्यांसाठी किंवा स्वतःसाठी उन्हाळ्यातील एक उत्तम 'रिफ्रेशिंग' ड्रिंक आहे.
Coconut Lassi Recipe
Sakal
Black grapes vs Green grapes
Sakal