Aarti Badade
उन्हाळ्याच्या सुट्टीत बाहेरची कुल्फी खाण्यापेक्षा घरच्या घरी मलाईदार आणि चविष्ट मटका कुल्फी बनवणे आता अतिशय सोपे आहे.
Matka Kulfi recipe
Sakal
या रेसिपीसाठी तुम्हाला दूध, साखर, काजू, बदाम, पिस्ता, वेलची पूड आणि फॉईल पेपर इतकेच साहित्य लागेल.
Matka Kulfi recipe
sakal
सर्वप्रथम एका पातेल्यात दूध घेऊन ते मंद आचेवर उकळा; दूध निम्म होईपर्यंत आटवून घेणे गरजेचे आहे.
Matka Kulfi recipe
sakal
मिक्सरच्या भांड्यात काजू, बदाम आणि पिस्ता घेऊन त्यांची छान पूड तयार करा आणि ही पूड आटवलेल्या दुधात वेलची पूडसह मिसळा.
Matka Kulfi recipe
Sakal
एका पॅनमध्ये साखर गरम करून ती सतत ढवळा; साखर विरघळून तिचा घट्ट कॅरेमल रंग आला की ते मिश्रण दुधात ओता.
Matka Kulfi recipe
Sakal
कॅरेमल घातल्यानंतर दूध आणखी ५ मिनिटे उकळा, ज्यामुळे मिश्रणाला एक छान गडद रंग आणि घट्टपणा (Texture) येईल.
Matka Kulfi recipe
Sakal
हे मिश्रण लहान मातीच्या मडक्यात (किंवा भांड्यात) ओता, वरून फॉईल पेपर लावा आणि रात्रभर फ्रिजरमध्ये सेट होण्यासाठी ठेवा.
Matka Kulfi recipe
Sakal
सकाळी तुमची थंडगार, मलाईदार मटका कुल्फी तयार असेल! घरच्या घरी बनवलेल्या या कुल्फीची चव विकतच्या कुल्फीपेक्षाही भारी लागेल.
Matka Kulfi recipe
Sakal
Raw Mango Koshimbir
Sakal