Aarti Badade
साध्या वरण-भाताची किंवा भाकरीची चव द्विगुणित करण्यासाठी कच्च्या कैरीची ही चटपटीत कोशिंबीर एक उत्तम पर्याय आहे.
Raw Mango Koshimbir
Sakal
कच्ची कैरी, कांदा, टोमॅटो, लसूण, कोथिंबीर, साखर, लाल तिखट, हळद, हिंग, गरम मसाला आणि फोडणीसाठी तेल व मोहरी.
Raw Mango Koshimbir
Sakal
कैरी थोडा वेळ पाण्यात भिजत ठेवा, तिची साल काढा आणि बारीक तुकडे करा. कांदा, टोमॅटो व कोथिंबीरही बारीक चिरून घ्या.
Raw Mango Koshimbir
Sakal
बारीक चिरलेल्या कैरीला चवीनुसार मीठ लावून थोडा वेळ बाजूला ठेवा; यामुळे कैरीला पाणी सुटून ती छान मऊ होते.
Raw Mango Koshimbir
Sakal
आता मऊ झालेल्या कैरीमध्ये चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, हळद, लाल तिखट आणि गरम मसाला घालून सर्व व्यवस्थित मिक्स करा.
Raw Mango Koshimbir
Sakal
फोडणीच्या पात्रात तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग आणि भरपूर ठेचलेला लसूण घालून तो लालसर होईपर्यंत खमंग परतून घ्या.
Raw Mango Koshimbir
Sakal
तयार झालेली गरम फोडणी कैरीच्या मिश्रणावर ओता आणि चमच्याने चांगले एकजीव करा. यात थोडी साखर घातल्याने चव अधिक खुलते.
Raw Mango Koshimbir
Sakal
तयार आहे तुमची आंबट-गोड कच्च्या कैरीची कोशिंबीर! ही कोशिंबीर फ्रिजमध्ये न ठेवता ताजी खाल्ल्यास अधिक चविष्ट लागते.
Raw Mango Koshimbir
Sakal
Green tea side effects
Sakal