Aarti Badade
पालक पनीर तर आपण नेहमीच खातो, पण दह्याचा वापर करून त्याला एक वेगळा ट्विस्ट दिला तर? आज आपण पाहणार आहोत अधिक चविष्ट आणि मलईदार पालक पनीरची रेसिपी.
Palak Paneer Recipe
Sakal
पालक (१ जुडी), पनीर (२०० ग्रॅम), १/२ कप घट्ट दही, कांदा-टोमॅटो, अद्रक-लसूण पेस्ट, खडे मसाले आणि कसुरी मेथी.
Palak Paneer Recipe
Sakal
पालक स्वच्छ धुवून उकळत्या पाण्यात २ मिनिटे टाका (Blanch). त्यानंतर लगेच थंड पाण्यात टाका. यामुळे पालकाचा हिरवा रंग कायम राहतो. आता मिक्सरमध्ये याची बारीक प्युरी करून घ्या.
Palak Paneer Recipe
Sakal
कढईत तेल किंवा तूप गरम करा. जिरे, चिरलेला कांदा आणि अद्रक-लसूण पेस्ट घालून तेल सुटेपर्यंत परता. त्यानंतर टोमॅटो घालून तो मऊ होईपर्यंत शिजवा.
Palak Paneer Recipe
Sakal
गॅसची आच मंद करा. आता त्यात फेटलेले दही हळूहळू घाला आणि सतत ढवळत राहा. दह्यामुळे ग्रेव्हीला एक अप्रतिम रिचनेस आणि हलकी आंबट चव मिळते.
Palak Paneer Recipe
Sakal
तयार मसाल्यात पालक प्युरी, हळद, धणे पावडर आणि गरम मसाला घाला. ५ ते ७ मिनिटे मंद आचेवर शिजवा जेणेकरून सर्व मसाले पालकात नीट मिसळतील.
Palak Paneer Recipe
Sakal
आता पनीरचे तुकडे (तळलेले किंवा कच्चे) ग्रेव्हीत टाका. वरून कसुरी मेथी हातावर चोळून घाला. चवीनुसार मीठ टाकून एक वाफ येऊ द्या.
Palak Paneer Recipe
Sakal
शेवटी थोडी फ्रेश क्रीम किंवा घरची साय घालून सजवा. हे स्वादिष्ट पालक पनीर रोटी, नान किंवा कुलच्यासोबत अतिशय चविष्ट लागते!
Palak Paneer Recipe
Sakal
Paneer Tikka Recipe
Sakal