Pranali Kodre
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा वार्षिक पुरस्कार सोहळा ३ फेब्रुवारी २०२५ रोजी पार पडला.
या सोहळ्यात खेळाडू ग्लॅमरस लूकमध्ये दिसून आले, त्यातही महिला खेळाडूंनीही यावेळी लक्ष वेधले.
या सोहळ्यात २०२४ वर्षात शानदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यात आला.
या पुरस्कार सोहळ्यात ऑस्ट्रेलियाच्या काही महिला खेळाडूंनीही ठसा उमटवला. यात पुरस्कार जिंकलेल्या महिला खेळाडूंचा थोडक्यात आढावा घेऊ.
सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटूचा प्रतिष्ठीत बेलिंडा क्लार्क पुरस्कार अष्टपैलू ऍनाबेल सदरलँड हिला मिळाला.
सर्वोत्तम वनडे महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार अष्टपैलू ऍश्ले गार्डनर हिला मिळाला.
सर्वोत्तम महिला आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटपटू पुरस्कार बेथ मुनीने पटकावला.
सर्वोत्तम महिला बिग बॅश लीगमधील सर्वोत्तम खेळाडू एलिस पेरी आणि जेस जोनासन ठरल्या.
सर्वोत्तम महिला देशांतर्गत क्रिकेटपटूचा पुरस्कार जॉर्जिया वॉल हिने पटकावला.
सर्वोत्तम युवा महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार क्लो ऐन्सवर्थ हिला मिळाला.