Pranali Kodre
भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू अभिषेक शर्माने वानखेडे स्टेडियमवर झालेला भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाचवा टी२० सामना गाजवला.
त्याने ३७ चेंडूतच शतक झळकावले. त्याने ५४ चेंडूत १३५ धावांची खेळी केली.
अभिषेक आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक करणारा दुसरा भारतीय क्रिकेटपटूही ठरला.
दरम्यान, त्याच्या या वादळी खेळानंतर त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही चर्चा सुरू झाली आहे.
अभिषेक शर्मा लैला फैझल या मुलीला डेट करत असल्याची चर्चा आहे.
लैला फैझल ही सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर आणि LRF या लग्झरी क्लोथिंग ब्रँडची मालकीन आहे.
२४ वर्षांची असलेली लैला दिल्लीची असल्याचे सांगितले जात असून तिला इंस्टाग्रामवर २७ हजारांहून अधिक फॉलोवर्स आहेत.
लैला आणि अभिषेक यापूर्वी एकत्र स्पॉटही झाले आहेत. त्यानंतर ही मिस्ट्री गर्ल कोण अशी चर्चा होती. त्यामुळे ते सध्या एकमेकांना डेट करत असल्याचे म्हटले जात आहे.