Pranali Kodre
बरोबर ४० वर्षांपूर्वी २५ जानेवारी १९८५ मध्ये नागपूरमधील सिव्हिल लाइन्समधील मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिला एकदिवसीय सामना झाला होता. सुनील गावस्कर यांच्या नेतृत्त्वातील भारतीय संघाने हा सामना तीन गड्यांनी जिंकला होता.
यानंतर आता तब्बल ४० वर्षांनंतर भारताने ६ फेब्रुवारी २०२५ रोजी साहेबांना ४ गड्यांनी धूळ चारत तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना जिंकला.
गुरुवारी व्हीसीएच्या जामठा स्टेडियमवर हजारो नागपूरकर क्रिकेटप्रेमींनी टीम इंडियाच्या विजयाचा ‘जम के’ आनंद लुटला. या सामन्यातील प्रेक्षकांचे विविध मुड्स ‘सकाळ’चे छायाचित्रकार प्रतीक बारसागडे यांनी आपल्या कॅमेऱ्यात अचूक टिपले.
शालेय विद्यार्थ्यांना सामन्याचा आनंद घेता यावा, यासाठी विदर्भ क्रिकेट असोसिएशनने यावेळी देखील शालेय विद्यार्थी व दिव्यांग मुलांना नाममात्र शंभर रुपयांत तिकिटे उपलब्ध करून दिले होते.
दरम्यान, ब्लॅक तिकीट विक्रीही या सामन्यादरम्यान झाल्याचे दिसले. पोलिस यंत्रणा सतर्क असूनही हा सर्व प्रकार लपूनछपून सुरू होता.
भारत-इंग्लंड सामन्यासाठी सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली होती. वर्धा मार्गावर टप्प्याटप्प्यावर पोलिस जवान तैनात करण्यात आले होते.
जामठा स्टेडियमवर एकदिवसीय सामना असो की ट्वेंटी-२०, वर्धा मार्गावर ‘ट्रॅफिक जॅम’ होणे नेहमीचेच चित्र आहे. तेच या सामन्यादरम्यानही दिसून आले.
भारत-इंग्लंड लढत पाहण्यासाठी नागपूरसह विदर्भातील विविध जिल्ह्यांमधून हजारो क्रिकेटप्रेमींनी जामठा स्टेडियमवर हजेरी लावली होती.