Pranali Kodre
भारतरत्न सचिन तेंडुलकरने ६ फेब्रुवारी रोजी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली.
त्याची द्रौपदी मुर्मू यांना विशेष पाहुणे म्हणून भेट झाली. सचिनसह यावेळी त्याची पत्नी अंजली आणि मुलगी सारा या देखील होत्या.
राष्ट्रपती भवनात सचिन आणि त्याच्या कुटुंबियांची भेट द्रौपदी मुर्मू यांच्याशी झाली.
सचिनने आणि राष्ट्रपती भवनाच्या सोशल मिडिया अकाउंटवरूनही या भेटीचे फोटो शेअर केले आहेत.
सचिनने या भेटीदरम्यान त्याची स्वाक्षरी केलेली जर्सी मुर्मू यांना भेटही दिली.
सचिनने यापूर्वी पुरस्कार स्वीकारण्यासाठी अनेकदा राष्ट्रपती भवनाला भेट दिली होती. पण यावेळी तो इथे विशेष पाहुणा म्हणून आला होता.
सचिनने राष्ट्रपती भवनात विमर्ष श्रृंखला कार्यक्रमातही उपस्थितीत दर्शवली. त्याने तिथे प्रेक्षकांसमोर त्याच्या प्रवासाबाबतही भाष्य केले.