Pranali Kodre
प्यार दोस्ती है!हा डायलॉग आपण अनेकदा ऐकलाच असेल. अशीच काहीशी लव्हस्टोरी आहे भारताचा स्टार क्रिकेटपटू भुवनेश्वर कुमार आणि त्याची पत्नी नुपूर यांची.
भुवनेश्वर कुमार आणि नुपूर यांच्या लग्नाला आता ७ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल नुकतेच त्यांनी एका पॉडकास्टमध्ये खुलासा केला.
भुवनेश्वर कुमारने रणवीर अहलाबादियाच्या पॉडकास्टवर सांगितले की नुपूर हिचे कुटुंब त्यांचे भाडेकरू होते.
झाले असे की नुपूरच्या वडिलांची मेरठला बदली झाली होती. त्यामुळे ते डेहराडूनमधून मेरठला राहायला आले होते, त्यावेळी ते भूवीच्या घरी भाड्याने राहात होते.
ज्यावेळी ते मेरठला आले, त्यावेळी नुपूर ११ वर्षांची होती, तर भूवी १३ वर्षांचा होता.
नुपूरचे कुटुंब अनेक वर्षे भूवीच्या कुटुंबाच्या घरात भाड्याने राहत होते. त्यानंतर नुपूरच्या वडिलांनी जवळच स्वत:चे घर घेतले.
पण या वर्षांमध्ये नुपूर आणि भूवी यांच्यातील मैत्री बहरत गेली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.
नुपूरने भूवीचे गोलंदाजीबद्दलचे प्रेमही पाहिले, पण तिने त्याला प्रत्येकवेळी साथ दिली.
लहानपणीची मैत्री पुढे जाऊन एका नात्यात बांधली गेली. त्यांनी नंतर घरच्यांना सांगितले आणि २३ नोव्हेंबर २०१७ मध्ये लग्न केले.
भूवी आणि नुपूर यांना २०२१ मध्ये मुलगीही झाली.