Pranali Kodre
भारताचा क्रिकेटपटू झहीर खान आणि बॉलिवूड अभिनेत्री सागरिका घाटगे हे लोकप्रिय सेलिब्रेटी जोडप्यांपैकी एक आहे.
नुकतेच एप्रिल २०२५ मध्ये त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले. या गोड जोडप्याची लव्हस्टोरीही खास आहे.
दरम्यान, सागरिकाच्या आधी झहीरच्या आयुष्यात डान्सर आणि अभिनेत्री ईशा शरवानी होती. ते २०११ मध्ये लग्नही करणार असल्याची चर्चा होती. पण २०१२ मध्ये ईशाने ते काही कारणाने वेगळे झाल्याचे स्पष्ट केले.
या ब्रेकअपनंतर झहीरच्या आयुष्यात सागरिका आली. त्यांच्या एका कॉमन फ्रेंडच्या पार्टीमध्ये हे दोघे भेटले. हा मित्र अंगद बेदी असल्याचेही म्हटले जाते, पण त्याबद्दल अधिकृत माहिती नाही.
पहिल्याच भेटीनंतर दोघांमध्ये मैत्री झाली. नंतर भेटी वाढल्या आणि हळुहळू मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.
त्यांनी त्यांच्या रिलेशनशीपबाबत फारशी चर्चाही केली नव्हती, पण युवराज सिंग आणि हेजल किच यांच्या लग्नात ते एकत्र दिसल्याने त्यांच्या रिलेशनशीपवर जवळपास शिक्कामोर्तब झाले होते.
तथापि, झहीर आणि सागरिका यांचे धर्म वेगळे असल्याने कुटुंबाला सांगणं मोठं आव्हान होतं. काही रिपोर्ट्सनुसार झहीरने त्याच्या कुटुंबाला सागरिकाची भूमिका असलेला 'चक दे इंडिया' चित्रपट दाखवला होता. त्यानंतर घरचे तयार झाले.
तरी फारसा विरोध दोघांच्याही घरच्यांनी केला नाही. त्यानंतर त्यांचे २३ नोव्हेंबर २०१७ रोजी त्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला.