Pranali Kodre
भारताचा क्रिकेटपटू रिंकू सिंगने ८ जून साखरपूडा केला होता.
रिंकूने उत्तर प्रदेशमधील खासदार प्रिया सरोजसोबत साखरपूडा केला असून त्यांनी सोशल मीडियावर फोटोही शेअर केले आहेत.
लखनौमधील एका आलिशान हॉटेलमध्ये त्यांचा साखरपूडा थाटात पार पडला होता. यासाठी क्रिकेट आणि राजकारणातील अनेक सेलिब्रेटीही उपस्थित होते.
साखरपूड्यानंतर १८ नोव्हेंबरला हे दोघे बनारसमध्ये लग्नबंधनात अडकणार होते. त्यासाठी हॉटेलचं बुकींगही करण्यात आलेलं. पण मिडिया रिपोर्ट्सनुसार आता ही तारीख रद्द करण्यात आली आहे.
रिंकू सिंग त्यादरम्यान देशांतर्गत क्रिकेटमध्ये व्यग्र असणार आहे. त्यामुळे लग्नाची १८ नोव्हेंबर ही तारीख रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे हॉटेल बुकींगही रद्द करण्यात आले आहे.
आता रिंकू आणि प्रिया यांचे कुटुंबिय मिळून लग्नाची नवीन तारीख ठरवतील. नव्या तारखेबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
प्रिया ही समाजवादी पार्टीची सदस्य असून उत्तर प्रदेशमधील नावाजलेले नेते तुफानी सरोज यांची मुलगी आहे.