Pranali Kodre
इंग्लंड विरुद्ध भारत संघात कसोटी मालिकेतील पहिला सामना हेडिंग्लेमध्ये २० ते २४ जून दरम्यान झाला.
या सामन्यात रिषभ पंतने दोन्ही डावात शतके करण्याचा पराक्रम केला आहे.
रिषभने पहिल्या डावात १७८ चेंडूत १३४ धावांची खेळी केली, तर दुसऱ्या डावात १४० चेंडूत ११८ धावांची खेळी केली.
तो कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतके करणारा ७ वा भारतीय ठरला.
यापूर्वी सुनील गावसकरांनी ३ वेळा, राहुल द्रविडने २ वेळा, तर विजय हजारे , विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा यांनी प्रत्येकी १ वेळा कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतके केली आहेत.
मात्र ९३ वर्षांच्या भारताच्या क्रिकेट इतिहासात इंग्लंडमध्ये कसोटी सामन्यात दोन्ही डावात शतक करणारा रिषभ पहिलाच भारतीय फलंदाज आहे. बाकी कोणीही यापूर्वी असा कारनामा केलेला नाही.
तसेच कसोटी सामन्यात दोन्ही डावात शतक करणारा रिषभ जगातील दुसराच यष्टीरक्षक आहे. यापूर्वी २००१ मध्ये अँडी फ्लॉवर यांनी असा कारनामा केला होता.
रिषभ पंतने इंग्लंडमध्ये ४ कसोटी शतके केली आहेत. तो इंग्लंडमध्ये ४ + कसोटी शतके करणारा भारताचा राहुल द्रविड (६), सचिन तेंडुलकर (४) आणि दिलीप वेंगसरकर (४) यांच्यानंतरचा चौथा फलंदाज आहे.