Aarti Badade
श्रावण सुरू आहे खास घरच्या घरी बनवा केळ्याचे कुरकुरीत चिप्स!
हिरव्या केळ्यांपासून बनवलेले कुरकुरीत चिप्स आता घरीही सहज बनवा! अगदी बाजारात मिळणाऱ्या चिप्ससारखे!
हिरवी केळी,तेल (तळण्यासाठी),मीठ,ऐच्छिक मसाले (लाल तिखट, चाट मसाला)
केळ्याची साल काढा. स्लाइसरने किंवा धारदार सुरीने पातळ काप करा. जाडसर काप टाळा.
कढईत तेल गरम करा. तेलात थोडं मीठ आणि पाणी मिसळा. त्यात केळीचे काप टाका. कुरकुरीत होईपर्यंत तळा.
तळलेले चिप्स टिशूवर काढा. गरम असतानाच मसाले शिंपडा. थंड झाल्यावर डब्यात ठेवा.
तेल मध्यम आचेवर गरम ठेवा
चिप्स तळताना बुडबुडे थांबल्यावरच काढा
खूप जाड किंवा खूप पातळ काप टाळा