स्टार्टरला परफेक्ट! कुरकुरीत आणि रसाळ सुरमई तवा फ्रायची सोपी रेसिपी

Aarti Badade

अस्सल कोकणी मेजवानी!

मासेप्रेमींच्या पसंतीची पहिली डिश म्हणजे 'सुरमई फ्राय'. आज आपण पाहणार आहोत घरच्या घरी हॉटेलसारखी कुरकुरीत सुरमई कशी बनवायची.

Surmai Fry Recipe

|

Sakal

मुख्य साहित्य

ताजी सुरमई (५ तुकडे), आलं-लसूण-मिरची-कोथिंबीर पेस्ट, लिंबाचा रस, मालवणी मसाला, हळद, काश्मिरी तिखट आणि कोकम आगळ.

Surmai Fry Recipe

|

Sakal

मॅरीनेशनचे गुपित

स्वच्छ धुवून कोरड्या केलेल्या सुरमईला मीठ, लिंबाचा रस, हिरवी पेस्ट, तिखट, हळद आणि कोकम आगळ लावून २० मिनिटे बाजूला ठेवा. यामुळे माशांना आतून छान चव येते.

Surmai Fry Recipe

|

Sakal

कोटिंगची तयारी

एका ताटात तांदळाचे पीठ आणि रवा एकत्र करा. त्यात थोडे मीठ आणि तिखट मिसळा. रवा वापरल्यामुळे सुरमई बाहेरून अतिशय कुरकुरीत (Crispy) होते.

Surmai Fry Recipe

|

Sakal

फ्राय करण्याची पद्धत

मॅरीनेट केलेली सुरमई तांदूळ-रव्याच्या मिश्रणात दोन्ही बाजूंनी व्यवस्थित घोळवून घ्या. जास्तीचे पीठ झटकून टाका.

Surmai Fry Recipe

|

Sakal

शॅलो फ्राय (Shallow Fry)

लोखंडी तव्यावर तेल गरम करून मंद आचेवर सुरमईचे तुकडे ठेवा. मासे शिजताना मध्ये मध्ये कडेने थोडे तेल सोडा, जेणेकरून ते तव्याला चिकटणार नाहीत.

Surmai Fry Recipe

|

Sakal

कुरकुरीत टेक्सचर

मंद आचेवर दोन्ही बाजूंनी गोल्डन ब्राऊन आणि कुरकुरीत होईपर्यंत मासे परता. घाई करू नका, मासे आतून चांगले शिजणे महत्त्वाचे आहे.

Surmai Fry Recipe

|

Sakal

गरमागरम सर्व्ह करा!

तयार आहे तुमची सुरमई तवा फ्राय! लिंबू, कांदा आणि टोमॅटोच्या फोडींसोबत स्टार्टर म्हणून किंवा भाकरी आणि वरण-भातासोबत याचा आस्वाद घ्या.

Surmai Fry Recipe

|

Sakal

शिळा मटण रस्सा? मग 10 मिनिटांत तयार करा झणझणीत मटण पुलाव

Leftover Mutton Curry Pulao recipe

|

Sakal

येथे क्लिक करा