पार्टी स्पेशल स्टार्टर! आता घरच्या घरी बनवा कुरकुरीत चिकन लॉलीपॉप

Aarti Badade

पार्टीसाठी परफेक्ट स्टार्टर

मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच चिकन लॉलीपॉप आवडतात. हॉटेलसारखी चव आणि कुरकुरीतपणा घरच्या घरी मिळवण्यासाठी ही रेसिपी नक्की ट्राय करा.

Chicken Lollipop recipe

|

Sakal

आवश्यक साहित्य

अर्धा किलो चिकन लॉलीपॉप पीसेस, २०० ग्रॅम लॉलीपॉप मसाला, १ अंडे, १ चमचा आले-लसूण पेस्ट, काश्मिरी मिरची पावडर, कॉर्नफ्लॉवर आणि तळण्यासाठी तेल.

Chicken Lollipop recipe

|

Sakal

पहिले मॅरिनेशन (Marination)

चिकन लॉलीपॉप त्याला मीठ, काश्मिरी मिरची पावडर, धना पावडर, मिरची आले-लसूण पेस्ट, 1 टीस्पून सोया सॉस, केचप, चिल्ली सॉस, शेजवान चटणी, आणि लॉलीपॉप मसाला लावून १ ते १.५ तास बाजूला झाकून ठेवा.

Chicken Lollipop recipe

|

Sakal

कोटिंगची तयारी

मॅरिनेशन झाल्यानंतर त्यात एक अंडे फेटून घाला आणि वरून कॉर्नफ्लॉवर टाका. यामुळे लॉलीपॉपला छान बाइंडिंग येते आणि तळल्यावर ते कुरकुरीत होतात.

Chicken Lollipop recipe

|

Sakal

तळण्याची योग्य पद्धत

कढईत तेल चांगले गरम करून घ्या. गॅस मध्यम आचेवर ठेवून लॉलीपॉप तेलात सोडा. दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.

Chicken Lollipop recipe

|

Sakal

शेजवान सॉससोबत सर्व्ह करा

"गरमागरम चिकन लॉलीपॉप तयार आहेत! हे लॉलीपॉप तिखट-चमचमीत शेजवान सॉस आणि कांद्याच्या स्लाईसेससोबत खायला द्या."

Chicken Lollipop recipe

|

Sakal

खास किचन टिप

जर तुम्हाला लॉलीपॉप जास्त कुरकुरीत हवे असतील, तर ते दोनदा तळा (Double Fry). एकदा अर्धवट तळून काढा आणि खाण्यापूर्वी पुन्हा कडकडीत तेलात २ मिनिटे तळा.

Chicken Lollipop recipe

|

sakal

अस्सल गावरान चव! झणझणीत 'काळं मटण'; जिभेवर रेंगाळेल अशी खास रेसिपी

Kala Mutton Rassa

|

Sakal

येथे क्लिक करा