Aarti Badade
मटण प्रेमींसाठी 'काळं मटण' म्हणजे एक पर्वणीच! भाजलेल्या खोबऱ्याचा आणि कांद्याचा सुवास असलेल्या या रश्श्याची चव काही औरच असते.
Kala Mutton Rassa
Sakal
अर्धा किलो मटण, चिरलेला कांदा, आलं-लसूण पेस्ट, हळद आणि मीठ तयार ठेवा. रश्श्यासाठी खास 'काळा गरम मसाला' आणि लाल तिखट वापरा.
Kala Mutton Rassa
Sakal
सुक्या खोबऱ्याची वाटी आणि अख्खे कांदे गॅसवर खरपूस काळसर रंगावर भाजून घ्या. थंड झाल्यावर लसूण आणि कोथिंबीर घालून मिक्सरमधून पाणी न घालता वाटून घ्या.
Kala Mutton Rassa
Sakal
कुकरमध्ये तेल गरम करून कांदा, आलं-लसूण पेस्ट आणि हळद-मिठात मटण परता. कोमट पाणी घालून ७-८ शिट्ट्या करून मटण मऊ शिजवून घ्या.
Kala Mutton Rassa
Sakal
एका कढईत तेल गरम करून तयार 'काळं वाटण' घाला. त्यात लाल तिखट आणि काळा मसाला घालून तेल सुटेपर्यंत आणि मसाल्याचा रंग गडद होईपर्यंत परता.
Kala Mutton Rassa
Sakal
शक्य असल्यास मातीच्या हंडीत तेल गरम करून हा मसाला परता आणि त्यात शिजवलेले मटण घाला. मंद आचेवर ७-८ मिनिटे रस्सा चांगला उकळू द्या.
Kala Mutton Rassa
Sakal
मटणाला मस्त तेलाचा तवंग (तरी) सुटला की कोथिंबीर घालून गॅस बंद करा. गरमागरम ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी आणि कांद्यासोबत आस्वाद घ्या!
Kala Mutton Rassa
Sakal
Kolambi Bhat recipe
Sakal