Aarti Badade
मुंबईचा फेमस वडा पाव घरच्या घरी तयार करा!
बटाटे, आलं-लसूण-मिरची पेस्ट, कोथिंबीर, उडदाची डाळ, मीठ, तेल, मोहरी, हिंग, हळद, कढीपत्ता, चणाडाळ पीठ, ज्वारीचे पीठ, तिखट, पाणी, हिरव्या मिरच्या, आले, ओलं खोबरं, लसूण, लाल तिखट, भाजलेलं खोबरं.
बटाटे उकडून घ्या. साले काढून छान स्मॅश करून बाजूला ठेवा.
चणाडाळ पीठ, ज्वारीचे पीठ, तिखट, मीठ, हळद घालून कोमट पाण्यात भिजवा.
बॅटर जास्त घट्ट किंवा पातळ नसावे.
कढईत तेल गरम करून मोहरी, हिंग, हळद, कढीपत्ता व उडदाची डाळ घालून फोडणी करा.
त्यात आलं-लसूण-मिरची पेस्ट टाकून एक मिनिट परता. नंतर स्मॅश केलेले बटाटे घालून मीठ टाका.
भाजी थंड झाली की त्याचे वडे तयार करा. हे वडे बॅटरमध्ये घोळवून सोनेरी रंगावर तळून घ्या.
हिरवी चटणी – कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, आले, ओलं खोबरं, मीठ, साखर.
लसूण चटणी – भाजलेलं खोबरं, लसूण पाकळ्या, लाल तिखट, मीठ.
खमंग वडे तळून गरमागरम पावासोबत हिरवी आणि लसूण चटणीसोबत सर्व्ह करा!