Aarti Badade
सज्जनगडची खास परंपरा! गोड, पौष्टिक आणि अतिशय चविष्ट लापशी.
लापशीचा रवा, गूळ, तूप, वेलची पावडर, काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड, गुलाब पाकळ्या, गरम पाणी
कुकरमध्ये तूप गरम करून त्यात लापशीचा रवा टाकून छान लालसर भाजावा.
भाजलेल्या रव्यात सहा वाटी गरम पाणी घालून कुकरला झाकण लावावे. ४-५ शिट्ट्या होऊ द्याव्यात.
कुकर थंड झाल्यावर झाकण उघडून गुळ टाकून छान एकजीव करावा. अर्धे ड्रायफ्रूट्स घालून हलवावे.
गूळ वितळला की शेवटी वेलची पावडर मिसळून चांगले हलवून घ्यावे.
लापशी भांड्यात काढून वरून उरलेले ड्रायफ्रूट्स आणि गुलाब पाकळ्यांनी सजवावी.
ही लापशी सैलसर, गोडसर आणि अतिशय पौष्टिक प्रसाद म्हणून आवर्जून बनवली जाते.