Aarti Badade
तुम्हाला सीफूड आवडत असेल, तर 'फिश भजी' एक उत्तम स्टार्टर आहे. बाहेरून कुरकुरीत आणि आतून ज्युसी असणारी ही डिश सर्वांचीच लाडकी आहे.
Fish fry bhaji recipe
Sakal
सर्वात आधी एका भांड्यात स्वच्छ केलेले मासे घ्या. त्यात मीठ, हळद आणि लिंबाचा रस घालून १०–१५ मिनिटे मुरत ठेवा. यामुळे माशांचा उग्र वास जातो आणि चव वाढते.
Fish fry bhaji recipe
sakal
दुसऱ्या एका भांड्यात बेसन, थोडे तांदळाचे पीठ (कुरकुरीतपणासाठी), लाल तिखट, गरम मसाला आणि आलं-लसूण पेस्ट एकत्र करून घ्या.
Fish fry bhaji recipe
Sakal
या कोरड्या मसाल्यांमध्ये थोडे थोडे पाणी घालून घट्टसर पीठ तयार करा. लक्षात ठेवा, पिठात गाठी राहू नयेत आणि ते माशांना चिकटण्याइतपत दाट हवे.
Fish fry bhaji recipe
Sakal
आता मॅरीनेट केलेले माशांचे तुकडे या तयार केलेल्या पिठात टाका. प्रत्येक तुकड्याला पिठाचे कोटिंग व्यवस्थित लागू द्या.
Fish fry bhaji recipe
Sakal
कढईत तेल चांगले गरम करा. तेल तापल्यावर मध्यम आचेवर माशांचे तुकडे एकेक करून सोडा. मध्यम आचेवर तळल्यामुळे मासे आतून नीट शिजतात आणि बाहेरून कुरकुरीत होतात.
Fish fry bhaji recipe
Sakal
भजी सोनेरी रंगाचे झाले की किचन टिश्यूवर काढून घ्या. वरून थोडे चाट मसाला भुरभुरा आणि पुदिना चटणी किंवा सॉससोबत याचा आस्वाद घ्या!
Fish fry bhaji recipe
Sakal
Prawns 65 stater recipe
sakal