Aarti Badade
ज्वारी, बाजरी, गहू यांची भाजणी किंवा मिश्र पीठ वापरून केलेला पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थ.
ज्वारी व बाजरीचं प्रमाण जास्त, गव्हाचं पीठ कमी. यामुळे चवदार पण हलकं थालीपीठ बनतं.
थालीपीठाचं पीठ ऐनवेळीच भिजवावं, त्यामुळे विरी जात नाही आणि चवही टिकते.
भाकरीपेक्षा सैल पण फार सैल नको – चिवट होऊ शकतं. आणि फार घट्ट केलं, तर कडक होण्याचा धोका!
मोहन म्हणजे तेल. फार घातलं, तर तुकडे पडत नाहीत, पण कमी घातल्याने थालीपीठ खुसखुशीत राहतं.
कोबी, गाजर, मेथी घालून थालीपीठ जास्त चविष्ट! पण मग थोडं तेल जास्त लागतं हे लक्षात ठेवा.
गरम तव्यावर थालीपीठ थापू नका. ओले कापड फिरवा, मग दुसरं थालीपीठ लावा. झाकण ठेवून एक बाजू वाफवावी!
खमंग थालीपीठ हवंय? तर थोडं तेल बाजूंनी सोडा – मराठवाड्याच्या आज्जींचा खास मंत्र!