Aarti Badade
मासे खाण्याची आवड असेल तर हा कुरकुरीत आणि झणझणीत हलवा फिश फ्राय तुमच्यासाठी एक उत्तम मेजवानी ठरेल.
Halwa Fish Fry Recipe
Sakal
हलवा फिशचे मध्यम तुकडे करून स्वच्छ धुवून घ्या आणि त्यांचा उग्र वास घालवण्यासाठी १० मिनिटे लिंबू किंवा कोकमाचे आगळ लावून ठेवा.
Halwa Fish Fry Recipe
Sakal
मिक्सरमध्ये हिरव्या मिरच्या, लसूण, आले, कोथिंबीर आणि धणे-जिरे यांचे जाडसर वाटण तयार करून घ्या.
Halwa Fish Fry Recipe
Sakal
फिशच्या तुकड्यांना हळद, लाल तिखट, आले-लसूण पेस्ट, तयार केलेले हिरवे वाटण आणि चवीनुसार मीठ लावून एकजीव करा.
Halwa Fish Fry Recipe
Sakal
एका ताटात रवा आणि तांदळाचे पीठ एकत्र करा; त्यात थोडे तिखट-मीठ घातल्याने फिशचे वरचे कव्हर चविष्ट आणि कुरकुरीत होते.
Halwa Fish Fry Recipe
Sakal
मसाला लावलेले फिशचे तुकडे रवा आणि तांदळाच्या पीठाच्या मिश्रणात चारही बाजूंनी व्यवस्थित घोळवून घ्या.
Halwa Fish Fry Recipe
Sakal
गरम तेलात मासे सोडून दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत आणि ते पूर्णपणे कुरकुरीत होईपर्यंत मध्यम आचेवर फ्राय करा.
Halwa Fish Fry Recipe
Sakal
तयार झालेला गरमागरम हलवा फिश फ्राय वरून लिंबू आणि कोथिंबीर पेरून तांदळाच्या भाकरीसोबत एन्जॉय करा!.
Halwa Fish Fry Recipe
Sakal
ghee Mutton Pulao Recipe
Sakal