Aarti Badade
सुट्यांच्या दिवशी काहीतरी खास खायचं असेल, तर कुकरमध्ये बनवलेला हा झणझणीत मटण पुलाव सर्वोत्तम पर्याय आहे.
ghee Mutton Pulao Recipe
Sakal
मटण स्वच्छ धुवून दही, आले-लसूण पेस्ट आणि मीठ लावून मॅरीनेट करा, ज्यामुळे मटण रसरशीत आणि चविष्ट होईल.
ghee Mutton Pulao Recipe
Sakal
कुकरमध्ये तूप गरम करून त्यात पातळ चिरलेला कांदा सोनेरी होईपर्यंत तळा आणि थोडा कांदा सजावटीसाठी बाजूला काढून ठेवा.
ghee Mutton Pulao Recipe
Sakal
त्याच तुपात तमालपत्र, दालचिनी यांसारखे खडे मसाले, टोमॅटो आणि हिरवी मिरची घालून खमंग परतून घ्या.
ghee Mutton Pulao Recipe
Sakal
आता त्यात हळद, लाल तिखट, कांदा-लसूण मसाला, मटण मसाला आणि बिर्याणी मसाला घालून मसाल्यांना तेल सुटेपर्यंत परता.
ghee Mutton Pulao Recipe
Sakal
मॅरीनेट केलेले मटण घालून परता, थोडे पाणी टाका आणि २ शिट्ट्या करून मटण अर्धवट शिजवून घ्या.
ghee Mutton Pulao Recipe
Sakal
भिजवलेला बासमती तांदूळ घालून हलक्या हाताने परता, गरम पाणी आणि चवीनुसार मीठ टाकून मंद आचेवर २ शिट्ट्या घ्या.
ghee Mutton Pulao Recipe
sakal
पुलाव तयार झाल्यावर वरून तळलेला कांदा आणि कोथिंबीर पेरा; तुमचा रसरशीत मटण पुलाव खाण्यासाठी तयार आहे!
ghee Mutton Pulao Recipe
Sakal
Malvani rassa and kombadi vade recipe
Sakal