दिवाळी फराळ! पातळ पोह्यांचा कुरकुरीत अन् खमंग चिवडा कसा बनवायचा?

Aarti Badade

चिवडा बनवण्याची सोपी कृती

दिवाळी आणि इतर सणांसाठी खास, कुरकुरीत आणि खमंग पातळ पोह्यांचा चिवडा घरच्या घरी कसा बनवायचा, ते पाहूया.

Diwali Faral poha chivda

|

Sakal

लागणारे साहित्य

१ किलो पातळ पोहे,१०० ग्रॅम शेंगदाणे, १०० ग्रॅम डाळवं, १०० ग्रॅम सुक्या खोबऱ्याचे काप, १०० ग्रॅम काजू,तळण्यासाठी तेल,हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, हिंग, हळद, जिरेपूड, चवीनुसार मीठ, १-२ चमचे पिठीसाखर

Diwali Faral poha chivda

|

Sakal

पोहे भाजून घ्या

पातळ पोहे स्वच्छ करून घ्या. एका मोठ्या कढईत थोडे तेल घालून पोहे मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत खरपूस भाजून घ्या.

Diwali Faral poha chivda

|

Sakal

फोडणीची तयारी

त्याच कढईत थोडे तेल घालून शेंगदाणे, डाळवं, खोबऱ्याचे काप आणि काजू सोनेरी रंगावर तळून घ्या.याच तेलात कढीपत्ता आणि हिरवी मिरची परतून घ्या.

Diwali Faral poha chivda

|

Sakal

चिवड्याची फोडणी

आता फोडणीत हिंग, हळद आणि जिरेपूड घालून परता. यानंतर तळलेले सर्व जिन्नस घाला आणि चांगले मिक्स करा.

Diwali Faral poha chivda

|

Sakal

पोहे मिक्स करा

भाजलेले पोहे या फोडणीत घाला आणि मंद आचेवर सर्व साहित्य व्यवस्थित मिसळेपर्यंत परता. शेवटी पिठीसाखर घालून पुन्हा एकदा मिक्स करा.

Diwali Faral poha chivda

|

Sakal

साठवणूक

चिवडा पूर्णपणे थंड झाल्यावर तो हवाबंद डब्यात भरून ठेवा. यामुळे तो महिनाभर कुरकुरीत राहील.

Diwali Faral poha chivda

|

Sakal

दिवाळी स्पेशल! घरच्या घरीच बनवा या सोप्या पद्धतीने 'कुरकुरीत अनारसे'

Authentic Maharashtrian Anarase

|

Sakal

येथे क्लिक करा