Aarti Badade
रात्रीचा मटण रस्सा उरलाय? काळजी नको! त्याच शिळ्या रस्स्यापासून तुम्ही अत्यंत चविष्ट आणि सुगंधी मटण भात तयार करू शकता.
Leftover Mutton Curry Pulao recipe
Sakal
उरलेला मटण रस्सा, १ कप भिजवलेला तांदूळ, कांदा, टोमॅटो, आलं-लसूण पेस्ट, खडे मसाले (तमालपत्र, लवंग, दालचिनी) आणि कोथिंबीर.
Leftover Mutton Curry Pulao recipe
Sakal
कुकरमध्ये तेल किंवा तूप गरम करा. त्यात जिरे, तमालपत्र, लवंग आणि दालचिनी घालून तडतडू द्या. खड्या मसाल्यांमुळे भाताला छान सुगंध येतो.
Leftover Mutton Curry Pulao recipe
Sakal
बारीक चिरलेला कांदा सोनेरी होईपर्यंत परता. त्यानंतर आलं-लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची घालून कच्चा वास जाईपर्यंत नीट परतून घ्या.
Leftover Mutton Curry Pulao recipe
Sakal
आता टोमॅटो घालून तो मऊ होईपर्यंत शिजवा. त्यात हळद, लाल तिखट आणि धणे-जिरे पूड घालून मसाल्यांना तेल सुटेपर्यंत परता.
Leftover Mutton Curry Pulao recipe
Sakal
भिजवलेला तांदूळ मसाल्यात मिसळा. आता त्यात उरलेला मटण रस्सा घाला. रस्सा कमी वाटल्यास थोडे गरम पाणी आणि चवीनुसार मीठ घाला.
Leftover Mutton Curry Pulao recipe
Sakal
कुकरचे झाकण लावून १-२ शिट्ट्या करून घ्या किंवा पातेल्यात मंद आचेवर भात शिजवा. रस्स्याची चव तांदळात पूर्णपणे उतरेपर्यंत वाट पाहा.
Leftover Mutton Curry Pulao recipe
Sakal
वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरमागरम मटण भात रायता किंवा कांद्यासोबत सर्व्ह करा. उरलेल्या रस्स्याचा यापेक्षा उत्तम वापर असूच शकत नाही!
Leftover Mutton Curry Pulao recipe
sakal
Murg Musallam Recipe Marathi
Sakal