Pranali Kodre
पोर्तुगालचा फुटबॉल स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोने गर्लफ्रेंड जॉर्जिना रोड्रिग्ससोबत नुकताच साखरपूडा उरकला.
रोनाल्डो आणि जॉर्जिना ८ वर्षांपासून एकत्र होते. त्यानंतर आता त्यांनी साखरपूडा केला असून जॉर्जिनाने सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली.
जॉर्जिनाने जो फोटो पोस्ट केला आहे, त्यात दोघांच्या हाताचे क्लोजअप फोटो शेअर केले असून जॉर्जिनाच्या हातात मोठी डायमंडची अंगठी दिसत आहे. तिने 'हो, आत्ता आणि माझ्या सर्व जन्मांसाठी' असं कॅप्शन लिहिले.
२०१७ पासून एकत्र असलेल्या जॉर्जिना आणि रोनाल्डो यांना ५ मुलं असून त्यांच्या एका मुलाचा जन्मावेळीच मृत्यू झाला. तसेच रोनाल्डोला आधीच्या रिलेशनशीपमधून एक मुलगा असून ज्याचं नाव ख्रिस्तियानो ज्युनियर आहे.
दरम्यान, जॉर्जिनाच्या बोटात असलेली साखरपुड्याची अंगठी तिच्या बोटाच्या अर्ध्याहून अधिक लांबीची आहे. साधारण ५ सेंटीमीटरपेक्षा अधिक लांब आहे.
अंगठीत अंडाकृती आकाराचा एक मोठा हिरा असून बाजूला सुमारे प्रत्येकी १ कॅरेटचे दोन छोटे हिरे आहेत.
काही ज्वेलरी एक्सपर्ट्सच्या नुसार मुख्य हिरा किमान १५ कॅरेटचा आहे, तर काहींच्या मते तो २५ ते ३० कॅरेटचा आहे.
मुख्य हिरा हा ‘फ्लॉलेस’ ग्रेडचा असून ब्रिलियंट कटमधील असल्याने जास्तीत जास्त प्रकाश परावर्तित करतो.
या अंगठीची किंमत अंदाजे २ ते ५ मिलियन अमेरिकन डॉलर्स (सुमारे १६.७ कोटी ते ४१.८ कोटी रुपये) आहे.