Pranali Kodre
पोर्तुगालचा दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने नुकताच त्याची ८ वर्षांपासूनची गर्लफ्रेंड जॉर्जिना रोड्रिग्ससोबत साखरपूडा केला आहे.
४० वर्षीय रोनाल्डो आणि जॉर्जिना गेल्या ८ वर्षांपासून एकत्र आहेत. ८ वर्षांच्या रिलेशनशीपनंतर जॉर्जिनाने एक पोस्ट शेअर करत साखरपूडा केल्याची बातमी सर्वांन दिली आहे.
जॉर्जिनाने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्या दोघांच्या हाताचे क्लोजअप फोटो शेअर केले आहेत. तसेच जॉर्जिनाच्या हातात मोठी डायमंडची अंगठी दिसत आहे.
जॉर्जिनाने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की 'हो, आत्ता आणि माझ्या सर्व जन्मांसाठी.'
३१ वर्षीय जॉर्जिना हिचा जन्म अर्जेंटिनामध्ये झाला असून ती स्पेनमध्ये लहानाची मोठी झाली.
जॉर्जिना ही मॉडेल आणि इन्फ्लुएन्सर असून तिने अनेक मोठ्या फॅशन हाऊससोबत कामं केली आहेत. तिने गुची, प्रादा, चॅनेल अशा अनेक मोठ्या कंपन्यांसोबत काम केले आहे.
तिचा नेटफ्लिक्सवर स्वत:ची रिऍलिटी सिरीज असून ज्याचं नाव 'आय एम जॉर्जिना' असं आहे.
जॉर्जिना आणि रोनाल्डो गुची कंपनीच्या स्टोअरमध्ये भेटले होते. तिथे जॉर्जिना काम करत होती. त्यानंतर २०१७ मध्ये त्यांनी त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केले होते.
त्यानंतर अनेक ठिकाणी जॉर्जिना आणि रोनाल्डो एकत्र दिसले, त्यांना मारिया, मतेओ, एलना आणि बेला ही अपत्यही आहेत. याशिवाय रोनाल्डोला आधीच्या रिलेशनशीपमधून ख्रिस्तियानो ज्युनियर हा मुलगाही आहे.
आता सारखपूडा उरकल्यानंतर रोनाल्डो आणि जॉर्जिना लग्न कधी करणार याची उत्सुकता चाहत्यांमध्ये पाहायला मिळत आहे.