विराट कोहली - रोहित शर्मा विजय हजारे ट्रॉफीमध्ये शेवटचे कधी खेळले?

Pranali Kodre

वनडे क्रिकेटमधील भवितव्य

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या वनडे क्रिकेटमधील भवितव्याबाबत चर्चेला उधाण आले आहे.

Rohit Sharma | Sakal

आंतरराष्ट्रीय टी२०, कसोटीतून निवृत्ती

विराट कोहली आणि रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय टी२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत. पण वनडेत सध्या सक्रिय आहेत.

Rohit Sharma - Virat Kohli | Sakal

वनडेतूनही निवृत्ती?

मात्र आता दैनिक जागरणने दिलेल्या वृत्तानुसार कदाचित ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे मालिका त्यांची अखेरची वनडे मालिका असू शकते.

Virat Kohli | Sakal

विजय हजारे ट्रॉफी खेळणार?

दरम्यान, बीसीसीआय या दोघांना भारतातील वनडेची देशांतर्गत स्पर्धा विजय हजारे ट्रॉफी खेळण्यास सांगण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, ज्यामुळे ते वनडे संघात स्थान मिळवण्यासाठी शर्यतीत कायम राहतील.

Rohit Sharma | Sakal

अनेक वर्षे खेळले नाहीत

दरम्यान गेली अनेक वर्षे हे दोघे विजय हजारे ट्रॉफी खेळलेले नाहीत.

Virat Kohli | Sakal

विराटचा शेवटचा सामना

विराट विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत १८ फेब्रुवारी २०१० रोजी दिल्लीकडून अखेरचा खेळला होता. त्यावेळी तो दिल्लीचा कर्णधार होता. त्याने सेनादलाविरुद्ध हा सामना खेळताना १६ धावा केल्या होत्या.

Virat Kohli | Sakal

रोहित शर्माचे शेवटचे सामने

रोहित शर्मा २०१८ मध्ये विजय हजारे ट्रॉफीच्या बाद फेरीत मुंबईकडून खेळला होता. त्याने उपांत्यपूर्व सामन्यात बिहारविरुद्ध नाबाद ३३ धावा आणि उपांत्य सामन्यात हैदराबादविरुद्ध १७ धावा केल्या होत्या.

Rohit Sharma | Sakal

अनेक वर्षांनंतर होणार पुनरागमन?

म्हणजेच विराट तब्बल १५ वर्षे, तर रोहित ७ वर्षांपासून विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळलेला नाही.

Rohit Sharma - Virat Kohli | Sakal

भारत - इंग्लंड कसोटी मालिकेत सर्वात जास्त सिक्स कोणी मारले? टॉप-५ फलंदाज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill - Rishabh Pant
येथे क्लिक करा