सकाळ वृत्तसेवा
दुष्काळ दोन प्रकारचे असतात: कोरडा दुष्काळ म्हणजे पाऊस अजिबात नसणे, आणि ओला दुष्काळ म्हणजे खूप जास्त पावसामुळे नुकसान.
जेव्हा सरासरीपेक्षा जास्त पाऊस होऊन ६५ मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद होते आणि ३३% पेक्षा जास्त पिकांचे नुकसान होते, तेव्हा ओला दुष्काळ जाहीर होतो.
पंचनाम्यात शेतात पाणी साचलेले, पीक सडलेले किंवा वाहून गेलेले आणि इतर नुकसानीची नोंद घेतली जाते.
ओल्या दुष्काळामुळे भाताचे पऱ्हे कुजतात, तुरी मुळासकट निघतात आणि खातं वाहून जातं.
सोयाबीन, कापूस, मिरची यांसारखी पिके सडतात. पुन्हा लागवड करायला १५-२० दिवस लागतात.
यामुळे शेतकऱ्यांचे पैसे, कष्ट आणि वेळ असे सगळेच वाया जाते.
ओला दुष्काळ जाहीर झाल्यास कर्जवसुली थांबते आणि नुकसानभरपाई मिळते. ३३% नुकसान असल्यास मदतीस शेतकरी पात्र ठरतो.
२०१५ च्या नियमानुसार, कोरडवाहूला ₹१३,०००/हेक्टर आणि बागायतीला ₹१८,०००/हेक्टर अशी ₹३४,००० पर्यंत मदत मिळते.
आज खतं, बियाणे आणि मजुरीचे दर वाढले आहेत, त्यामुळे ही मदत पुन्हा लागवड करण्यासाठी पुरेशी नाही.