Shubham Banubakode
शिवरायांनी डोंगरी भागातील किल्ल्यांचा उपयोग संरक्षणासाठी केला. याबरोबरच त्यांनी तेथे पाण्याचा शोध घेतला.
शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्राचे आठवे प्रकरण 'दुर्ग' यात पाणी आणि दुर्ग यांच्यातील सहसंबंध स्पष्ट केले आहेत.
या आज्ञापत्रात महाराज म्हणतात, ''आधी खडक फोडून तिथे तळी बांधावी, झऱ्याच्या पाण्यावर विसंबून राह नये; कारण झऱ्यांची दिशा बदलते.''
''युद्धातील तोफांच्या आवाजामुळे झऱ्यांचे पाणी कमी होतात. किल्ल्याच्या संरक्षणाच्या दृष्टीने पाणी अत्यंत महत्त्वाचे व अनन्यसाधारण आहे.''
''प्रत्येक किल्ल्यावर वर्षभर पुरेल अशी पाण्याची साठवणूक करून मजबूत व्यवस्था करावी.''
''प्रसंगी गडावर हल्ला झाला, तर आणीबाणीच्या काळातही आवश्यक तो पाणीसाठा कसा राहील, याची काळजी घ्यावी.''
शिवरायांनी किल्ल्यामध्येच खाणी, तलाव, हौद किंवा दगडांच्या उतरणीवर खोल खड्डे निर्माण करून पाण्याची व्यवस्था केली होती.
जलाभेद्य खडकांची मुबलकता आढळली तर त्यातले मधले खडक अलगद काढून किंवा पाणी पाझरत राहील इतके तासून तलाव तयार केले.
रायगडावरील गंगासागर तलाव, कोळींब तलाव प्रतापगडावरील रहाटाचे तळे, भवानी तलाव ही त्याची काही उदाहरणे आहेत.
आजच्या भाषेत बोलायचं झाल्यास महाराजांनी डोंगरी किल्ल्यावर एकप्रकारे 'रेन वॉटर हार्वेस्टिंग' केले.