संतोष कानडे
क्रूड ऑईल म्हणजे कच्चं तेल अमर्याद नक्कीच नाही. ते कधीतरी संपणारं आहे. या तेलाला जीवाश्म इंधन असंही म्हणतात.
लाखो, कोट्यवधी वर्षांपूर्वी भूगर्भात गाडलेले जलचर प्राणी आणि वनस्पतींच्या विघटनातून हे तेल तयार झालेलं आहे.
त्यामुळे हे इंधन कधी ना संपणारं आहे. ताज्या माहितीनुसार, हे तेल पुढच्या ४५ ते ५० वर्षांमध्ये संपुष्टात येईल.
ब्रिटिशी पेट्रोलियम आणि इतर ऊर्जा संस्थांच्या मते, जर आपण सध्या वापरतो तेवढं तेल वापरत राहिलो तर २०८० पर्यंत कच्च्या तेलाचे पारंपारिक साठे संपतील.
मात्र जिथे यापूर्वी पोहोचणे कठीण होते, तिथे आता तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तेल काढलं जातं. त्यामुळे ही तारीख पुढे ढकलली जाते.
मुळात भविष्यात तेलाची मागणीच कमी होईल, यावर अनेक देश फोकस करीत आहेत. इलेक्ट्रिक वाहने, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा यामुळे तेलाचा वापर तसा कमी होईल.
विशेष म्हणजे रशिया, अमेरिका, सौदी अरेबिया हे देश सातत्याने नवीन तेलसाठे शोधत असतात. गियाना आणि ब्राझील अशा देशांमध्येही तेल सापडले आहे.
वरचेवर तेलाचे साठे जमिनीत किंवा समुद्रात खोलवर सरकत आहेत. त्यामुळे ते तेल बाहेर काढणं फारच खर्चिक होऊन जातंय.
याशिवाय जागतिक स्तरावर कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी अनेक देश कठोर कायदे करीत आहेत. याचा परिणाम तेलाच्या वापरावर होईल.
त्यामुळे तेल संपण्याआधीच त्याचा मर्यादित वापर होऊ शकतो, असं तज्ज्ञ सांगतात. शिवाय इतर ऊर्जा स्त्रोतांकडे कल वाढलेला आहेच.