संतोष कानडे
भारतामध्ये दिवसाला अंदाजे ५.८ लाख ते ६ लाख बॅरल कच्च्या तेलाचं उत्पादन होतं.
तर भारताला दररोज ५० ते ५५ लाख बॅरल तेलाची गरज असते. म्हणजे भारत गरजेपेक्षा १२ ते १५ टक्के तेल स्वतः तयार करतो.
गरजेचं उर्वरित ८५ टक्के ते ८८ टक्के तेल रशिया, इराक, सौदी अरेबिया या देशांकडून भारत आयात करतो.
भारतातील प्रमुख तेल उत्पादक क्षेत्रांमध्ये बॉम्बे हाय, राजस्थानमधलं मंगला क्षेत्र, आसाममधलं दिग्बोई, गुजरातमधलं अंकलेश्वर, खंभात या भागांमधून तेल काढलं जातं.
भारतामध्ये ONGC ही प्रमुख तेल कंपनी आहे. ही एक सरकारी कंपनी असून भारताच्या एकूण तेल उत्पादनात कंपनीचा वाटा ६५ ते ७० टक्के आहे.
ऑईल इंडिया लिमिटेड या कंपनीचे ईशान्य भारतामध्ये मोठं जाळं आहे. तसेच खासगी क्षेत्रातील Cairn Oil & Gas (Vedanta) ही मोठी कंपनी आहे.
भारतातील सध्याच्या तेल विहिरी जुन्या झालेल्या आहेत. त्यामुळे तिथून तेल काढण्याचं प्रमाण कमी होत आहे.
नवीन तेलसाठे शोधणं आणि त्यासाठी वेळ खर्च करणं खर्चिक काम असल्याने त्याकडे म्हणावं तेवढं लक्ष दिलं जात नाही.