मुलींच्या अंगावर मध लावून मुंग्यांसमोर सोडायची! या राणीची क्रूर कहाणी ऐकून अंगावर येईल काटा

Vinod Dengale

क्रूर राणी

हंगेरीची काउंटेस एलिझाबेथ बाथरी हिला इतिहासातील सर्वात क्रूर महिलांपैकी एक मानलं जातं. तिच्या अत्याचारांमुळे तिला ‘ब्लड काउंटेस’ म्हटले जाते .

CruelQueen

महालातच अत्याचार

बाथरीच्या महालात तरुण मुलींना अमानुष यातना दिल्या जात असल्याचे आरोप होते. तिच्या श्रीमंत आणि प्रभावशाली कुटुंबामुळे तिच्याविरोधात कोणी आवाज उठवला नाही.

मध

ती तरुण मुलींच्या शरीरावर मध लावून त्यांना मुंग्या आणि कीटकांच्या स्वाधीन केल्याचा दावा केला जातो. याशिवाय नखाच्या भागामध्ये सुई टोचण्यासारख्या यातनाही दिल्याचे आरोप आहेत.

क्रूरता

1600च्या सुरुवातीला तिच्या पतीचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या अत्याचारांमध्ये आणखी वाढ झाल्याचे सांगितले जाते.

रक्ताने अंघोळ

बाथरी तरुण मुलींच्या रक्ताने अंघोळ करत असे, अशी प्रसिद्ध कथा आहे; मात्र त्यास ठोस पुरावा नसल्याचे इतिहासकार सांगतात.

श्रीमंत

सुरुवातीला तिच्या अत्याचारांच्या बळी गरीब कुटुंबांतील मुली असल्याचे सांगितले जाते. मात्र जेव्हा श्रीमंत घराण्यांतील मुलीही लक्ष्य बनल्या, तेव्हा तिच्याविरोधात मोठा दबाव निर्माण झाला.

Rich

महालावर छापा

1610च्या आसपास राजा मॅथियसच्या आदेशानंतर काउंट ज्योर्गी थुर्झोच्या नेतृत्वाखाली तिच्या महालावर छापा टाकण्यात आला.

अंधाऱ्या खोलीत कैद

बाथरीला मृत्युदंड न देता तिच्याच महालातील खिडकी नसलेल्या एका खोलीत आयुष्यभरासाठी कैद करण्यात आलं. 1614 मध्ये तिचा त्याच एकांतवासात मृत्यू झाला.

End

150 वर्षांपूर्वी भारत असा दिसत होता!

150 Years Old India

|

eSakal

हेही वाचा