Pranali Kodre
न्यूझीलंड क्रिकेट संघ हेमिल्टनमध्ये इंग्लंडविरुद्ध १४ डिसेंबरपासून तिसरा कसोटी सामना खेळत आहे.
मात्र, या सामन्यात सलामीवीर डेवॉन कॉनवे खेळला नाही, यामागील कारण म्हणजे त्याच्या वैयक्तिक आयुष्यात एक आनंदाची गोष्ट घडली आहे.
डेवॉन कॉनवे पहिल्यांदाच बाबा झाला आहे. कॉनवेची पत्नी किम हिने नुकतेच मुलीला जन्म दिला आहे.
किम हिने मुलीची झलक दाखवणारी फोटो पोस्टही केली असून त्यात मुलीचे नाव ऑलिविया ठेवले असल्याचे सांगितले.
चेन्नई सुपर किंग्सकडून आयपीएलमध्ये खेळणाऱ्या कॉनवे आणि त्याच्या पत्नीवर त्यांच्या मुलीच्या जन्माबद्दल अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
डेवॉन आणि किम यांनी याआधी मिसकॅरेजमुळे मुलगी गमावली होती. पण दु:खानंतर आता त्यांच्या आयुष्यात ऑलिवियाच्या आगमनाने आनंद पसरला आहे.
डेवॉन आणि किम यांनी एप्रिल २०२२ मध्ये लग्न केले होते.